“आजीबाईंची शाळा” चित्रपटात झळकणार 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन 

एक अनोखी शाळा म्हणून मुरबाड तालुक्यातल्या फांगणे गावची ‘आजीबाईंची शाळा’ जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली आहे. या अनोख्या शाळेवर आता चित्रपट निर्मिती होणार आहे. आजीबाईंची शाळा’ आता चित्रपटात झळकणार असून एका चित्रपट निर्मिती संस्थेकडून त्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01DW7PEE4,B003VKI69I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33ec4922-affd-11e8-9031-c56ea83627ae’]

अनेक कारणास्तव शिक्षणापासून दुरावलेल्या वयोवृद्ध महिलांना अक्षर ओळख करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली. या शाळेला गुरुवारी सुट्टी असते. आठवड्यातले उरलेले सगळे दिवस ही शाळा भरते. दुपारी दोन ते चार या वेळेत ही शाळा भरते. गुलाबी रंगाची नऊवारी हा शाळेचा गणवेष आहे. या शाळेत गावातील ६० ते ९० वयाच्या सर्व आजीबाईंनी सहभाग नोंदवत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध केले. या उपक्रमाची दखल देशासह जगभरातील संस्था, वृत्तवाहिन्या आणि व्यक्तींनी घेतलेली आहे तसेच या शाळेची लिम्का बुक मधेही नोंद झालेली आहे.

या अनोख्या उपक्रमाची दखल घेत मुंबईच्या ‘जेडी आईस’ संस्थेने ‘आजीबाईंची शाळा’ विषयावर चित्रपट निर्मितीची इच्छा व्यक्त केली  आहे. संस्थेने शाळेला रीतसर पत्र पाठविले असून त्यांना या विषयावर चित्रपट तयार करण्याची परवानगी दिली असल्याचे योगेंद्र बांगर यांनी सांगितले. चित्रपटाचे लेखन आशिष निनगुनकर आणि दिग्दर्शन युसूफ खान करणार आहेत.

अशी झाली आजीबाईंच्या शाळेची सुरुवात

फांगणे गावात शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचं पारायण होतं. गावातल्या महिला शिवचरित्राच्या पारायणाला बसल्या होत्या. त्यावेळी तिसेक आजीबाई अशा होत्या ज्यांना त्यात सहभागी व्हायचं होतं, पण वाचता येत नसल्यामुळे ते त्यांना शक्य झालं नाही. बोलता बोलता त्या योगेंद्र बांगर सरांना म्हणाल्या, सर तुम्ही आमच्या नातवंडांना लिहायला, वाचायला शिकवता. आज आम्हाला लिहिता, वाचता आलं असतं तर आम्ही पण पारायणाला बसलो असतो. त्यातूनच ‘आजीबाईंची शाळा’ सुरू करावी अशी कल्पना सुचली. ८ मार्च २०१६ला महिलादिनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही शाळा सुरू झाली.

‘पानिपत’ साठी एन. डी. स्टुडिओत साकारला शनिवार वाडा