आमदार बनला ‘पंक्चर’वाल्या देशमुखांचा मुलगा, लाखोंची नोकरी सोडून जाॅईन केली होती AAP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा एकदा सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. एकून ७० जागांपैकी आम आदमी पक्षाने ६२ जागांवर विजय मिळविला आहे. या ६२ पैकी एक आहे जंगपुरा येथील आपचे प्रवीण देशमुख. एमबीए करून दिल्लीला आलेल्या प्रवीण आपला लाखो रुपयांचा पगार सोडून अरविंद केजरीवाल यांच्या चळवळीचा एक भाग बनले. सुमारे ३५ वर्षांचे प्रवीण मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल येथील आथनेर या छोट्या गावातील रहिवासी असून त्याचे वडील भोपाळमध्ये टायर पंक्चर करण्याच काम करतात. मुलगा दुसऱ्यांदा आमदार झाला, पण वडिलांनी नोकरी सोडली नाही.

प्रवीण कुमार यांचे संपूर्ण बालपण संघर्षात गेले. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रविण लहानपणापासूनच हुशार होते. आथनेर येथे शिक्षण घेतल्यानंतर ते भोपाळ येथे गेले आणि टीआयटी महाविद्यालयात बी.एस्सी नंतर एमबीए केले. आपल्या मुलाचा अभ्यास सुरु राहावा, म्हणून त्यांचे वडील पंढरीनाथ देशमुख देखील भोपाळ येथे आले आणि येथे पंक्चर आणि टायर रीमॉल्डचे काम करून प्रवीण यांचे चांगले शिक्षण केले. प्रवीणलाही आपल्या वडिलांच्या मेहनतीची जाणीव झाली आणि त्याने एमबीए व्यावसायिक म्हणून आपली कारकीर्द बनविली.

शिक्षण घेतल्यानंतर प्रवीणला दिल्लीच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिन्याकाठी सुमारे ५० हजार रुपयांची नोकरी मिळाली. पण त्यानंतर अण्णा हजारेंच्या चळवळीने ते इतके प्रभावित झाला की त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ते चळवळीत सामील झाले. जंतर-मंतरवरील चळवळ जागृत ठेवण्यासाठी ते दिवस आणि रात्री घालवत असत. आंदोलन संपल्यावर ते अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले. यावेळी त्यांनी शाळा प्रवेशातील देणगी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. नर्सरी प्रवेशामध्ये देणगी रोखण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ३०० कामगारांसह त्यांनी पाच दिवसांत दिल्लीतील ९९० सरकारी शाळांची पाहणी केली.

त्यांनतर पक्षाने त्यांना दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. २०१९ च्या निवडणुकीच्या आधी जंगपुरा येथील आपचे आमदार एम.एस. धीर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आपने जंगपुरा येथे धीर विरुद्ध प्रवीण देशमुख यांना तिकीट दिले. निवडणुकीचा निकालानंतर पंक्चरवाल्याचा हा मुलगा २० हजाराहून अधिक मतांनी निवडून आला. त्यात आताच्या (२०२०) निवडणुकीत प्रवीणकुमार यांनी पुन्हा विजयाचा जयजयकार करीत कुटुंबाचे नाव गाजवले केले आहे.