home page top 1

आमीर खान-किरण रावचा ‘या’ अंदाजातला फोटो होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या अभिनयाने चाहत्यांना मोहिनी घालणाऱ्या मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान याचा नवीन फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोत एकटा आमीर खान नाही तर त्यांची बायको किरण राव देखील आहे. आमीर आणि किरण हे दोघेही या फोटोत पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात आहेत. सध्या त्यांच्या या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे.

या फोटोमध्ये आमीर डोक्यावर टोपी घातलेला दिसत आहे. सदरा, लेहंगा असा त्याचा पोषाख आहे. तर नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर पदर घेत किरण राव आमीरसोबत दिसत आहे. आमीरने स्वत: हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना आपल्या बायकोसाठी त्याने खास संदेशही लिहला आहे. ‘The cutest in the world… mazi baiko ❤’ असं म्हणत आमीरने किरणचं कौतुक केलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात आमीर आणि किरण या जोडप्याने हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हा फोटो काढला होता. त्यानंतर आमीरने हा फोटो शेअर केला. हा फोटो काही काळातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांना त्यांचा हा मराठमोळा लुक भलताच आवडलेला दिसत आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने या फोटोला पसंती दिली आहे.

Loading...
You might also like