आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमिर खानची लाडकी इरा खानने आपलं रिलेशनशिप कंफर्म केलं आहे. म्युझिशियन मिशाल कृपलानीला ती डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची अफवा होती की, इरा मिशालला डेट करत आहे. परंतु इराने कधीच ऑफिशियल केलं नव्हतं. परंतु आता मात्र इराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून हे कंफर्म केलं आहे. इराच्या इंस्टावरील स्टोरीला एका फॅनने विचारले की, तू रिलेशनशिपमध्ये आहेस का ? यावर उत्तर देताना इराने एका फोटोसोबत याचे उत्तर दिले ज्यात ती मिशालला हग करताना दिसत आहे. या स्टोरीत इऱाने मिशालला टॅगही केले आहे.

irra khan2

इराने अनेकदा इंस्टाग्रामवर मिशालसोबत फोटो शेअर केले आहे. याआधीही इराने व्हॅलेंटाईन डे ला मिशालचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात दिसत होतं की, मिशाल पियानोसमोर बसून गात होता. मिशालदेखील इरासोबत फोटो पोस्ट करत असतो. त्याने इंस्टावरच इराला क्युट बर्थ डे विश केलं होतं. याआधीही कॉफी विद करण च्या सीजन 6 मध्ये आमिर खान म्हणाला होता की, जुनैद आणि इरा फिल्म इंडस्ट्रीत आपलं भविष्य शोधत आहेत.

आमिरने सांगितले होते की, “जुनैदला अ‍ॅक्टर बनायचे आहे. तर इराला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. आमिर खान इराच्या फिल्म इंडस्ट्री जॉईन करण्याच्या शक्यतेवर बोलला होता. इरा खान, आमिर खान आणि रिना दत्त यांची लहान मुलगी आहे. आमिर आणि ती मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा दिसून येतात.

आरोग्यविषयक वृत्त

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like