आमीर खानची मुलगी इरासोबत दिसणारा हा तरुण तिचा बाॅयफ्रेंड आहे का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाॅलिवूडचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खन याची मुलगी इरा ही तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळीही इराने एक फोटो शेअर केला आहे. इराने एका तरुणासोबत फोटो शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोटोमध्ये दिसणारा तरुण हा इराचा बाॅयफ्रेंड आहे का ? असा प्रश्न अनेक जणांनी कमेंटमध्ये केल्याचे दिसत आहे.

इराने कॅलिफोर्नियातील सांता बार्बरामधील आपले 3 फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. ‘तुमची सुट्टी मिशालसारखीच हसरी गेली असेल, अशी आशा.’ असं कॅप्शन देताना तिने तीन बदामही जोडले आहेत.

https://www.instagram.com/p/Bvazw9fHozx/?utm_source=ig_embed

दरम्यान इराने पोस्ट केलेल्या फोटोत तिच्यासोबत दिसणाऱ्या तरुणाचे नाव मिशाल कृपलानी आहे. तिने पोस्ट केलेल्या तीन फोटोंपैकी दोन फोटोंमध्ये इरा मिशालसोबत बसलेली दिसत आहे. परंतु तिने पोस्ट केलेला तिसरा फोटो जो आहे. त्याने अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. कारण या फोटोत मिशाल चक्क इराच्या कपाळावर किस करताना दिसत आहे.

Aamir-Khan

मिशाल हा एक कलाकार असून तो एक संगीतकार म्हणून नावारूपाला येत आहे. त्याने त्याच्या काही कलाकृती इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. दरम्यान इरा आणि मिशाल यांच्यात काही सुरु आहे किंवा नाही हे मात्र इतक्यात काही सांगता येत नाही. सध्या तरी इराचं शिक्षण सुरु आहे. तिला चित्रपट निर्मितीमध्ये रस असल्याचं आमीरने सांगितलं होतं. यापूर्वी कमी कपडे घालून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर मात्र इराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आमीर खानसोबतच्या तिच्या आणखी एका फोटोमुळे ती टीकेची धनी झाली होती.