दिल्लीतील अभूतपूर्व यशानंतर AAP महाराष्ट्रासह देशभरात ‘मनपा’च्या निवडणुका लढविणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रासह देशभरातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे.

विकासकामांच्या मुद्द्यावर दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीने पक्षाचा विस्तार देशभरात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे निकाल जाहीर होत असतानाच बहुमताची खात्री पटताच मतमोजणीच्या दिवशीच पार्टीने ऑनलाइन सदस्य नोंदणीला सुरुवात केली. पहिल्या तीन दिवसात अकरा लाख सदस्य नोंदणी झाली. हा प्रतिसाद पाहून आम आदमी पार्टीने पक्ष विस्ताराची दमदार पावले टाकायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून पक्ष रुजवण्याचा पार्टीचा मानस आहे. या निमित्ताने पक्षाला देशभरात कार्यकर्ते मिळतील आणि संघटना बांधणे सोपे जाईल.

महाराष्ट्रात नजीकच्या काळात औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होत आहे ती निवडणूक लढवून आम आदमी पार्टी सुरुवात करणार का ? याची उत्सुकता आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन वर्षांनी होणार आहेत. पुण्यातील सर्व जागा लढविण्यासाठी पार्टीच्या दिल्ली युनिटने मंजुरी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like