AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad | ‘आप’च्या पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवात

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची सुरुवात पंढरपुरामध्ये विठू रखमाईचा आशीर्वाद घेऊन झाली (AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad). आम आदमी पार्टीचे Aam Aadmi Party (AAP) राष्ट्रीय सहसचिव आणि महाराष्ट्राचे सह प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया (Gopal Italia) यांच्यासह रंगा राचुरे (Ranga Rachure), अजित फाटके पाटील (Ajit Phatake Patil), प्रीती शर्मा मेनन (Priti Sharma Menon), एम. पाटील (M. Patil AAP) तसेच अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या देवळामध्ये दर्शन घेतल्यावर शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांना आणि आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करून पंढरपूर गावांमधून घोषणा देत यात्रा पुढे मंगळवेढामार्गे सोलापूरकडे (Solapur) रवाना झाली. आजच्या यात्रेला पंढरपुरात जोरदार प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील दोन -तीन हजार कार्यकर्ते या यात्रेमध्ये सामील झाले आहेत. (AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad)

 

महाराष्ट्रामध्ये सर्वच निवडणुकांना स्थगिती असल्यामुळे सर्वत्र प्रशासनच राज्य करीत आहे. प्रशासनामार्फत भाजपच (BJP) दडपशाहीचा कारभार महाराष्ट्रात करीत आहे. जगामधील सर्वात मोठा पक्ष म्हणून देणारा भाजप महाराष्ट्रात मात्र निवडणूक हरण्याच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या जातील असे धोरण राबवत आहे असे गोपाल इटालिया यांनी सांगितले. (AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad)

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकार (Shinde-Fadnavis Govt) या प्रश्नांची उत्तरे टाळत आहे. विमा योजना ही कंपन्यांची नफेखोरी करणारी लॉटरी योजना आहे. याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. पंढरपुरातील साखर कारखाना भ्रष्टाचारा वरती सुद्धा यांनी टीका केली.

 

Advt.

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.
त्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ही स्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे.

 

Web Title :  AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad | AAP’s 800 km Swaraj Yatra from
Pandharpur to Raigad begins strongly from Pandharpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा