Abdul Sattar On Uddhav Thackeray | ‘…तर पहिल्याच निवडणुकीत किती मतांनी जिंकतो हे दाखवणार’ – अब्दुल सत्तार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Abdul Sattar On Uddhav Thackeray | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय सामना रंगला आहे. नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ‘हिंमत असेल तर माझ्या वडिलांच्या फोटोशिवाय मतं मागून दाखवा,’ असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला केले आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (MLA Abdul Sattar) यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. (Abdul Sattar On Uddhav Thackeray)

 

माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “मला राजीनामा देण्याची परवानगी द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली. परवानगी दिली तर मी उद्या राजीनामा देणार आणि पहिल्या निवडणुकीत किती मतांनी निवडून येणार हे त्यांना (उद्धव ठाकरे) दाखवून देणार असल्याचे,” ते म्हणाले. (Abdul Sattar On Uddhav Thackeray)

 

पुढे सत्तार म्हणाले, “येत्या 31 तारखेला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यात येणार आहेत. सर्व जनता शिंदे यांची वाट पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात शिंदे यांचा एकही आमदार पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. मी 42 वर्षांपासून राजकारणात, 25 वर्षांपासून आमदार, तीन वेळा मंत्री झालो. ते एकदाच मुख्यमंत्री झाले आहेत, असे म्हणत आम्ही गद्दार नाही असेही,” ते म्हणाले.

दरम्यान, “आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) माझ्या मतदारसंघात कधी आलेच नाही.
म्हणूनच माझ्यासारख्या गद्दाराच्या मतदारसंघात या, असं मी त्यांना निमंत्रण देतो.
एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आहेत. हे सर्व करताना उद्धव ठाकरेंना शिंदे यांच्या निष्ठेवर शंका आहे.
आम्ही आता युतीचा धर्म पाळत आहोत. त्यांनी सर्व दरवाजे बंद केले.
एकीकडे नेत्याला बदनाम करायचे आणि दुसरीकडे तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत
असे म्हणायचे हे राजकारण नसते, असेही सत्तार यांनीव म्हटले आहे.

 

Web Title :- Abdul Sattar On Uddhav Thackeray | mla abdul sattar challenges
shivsena chief uddhav thackeray said will win election with huge margin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा