Abhidnya Bhave | संक्रांतिनिमित्त मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने केले खास फोटोशूट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अभिज्ञा 6 जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकली आहे. त्यानंतर तिने संक्रांतीच्या निमित्ताने स्पेशल फोटो शूट करत इंस्टाग्राम वर फोटो शेअर केले आहेत. अभिज्ञाने (Abhidnya Bhave) फोटो शेअर करत चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिज्ञाचा पती मेहुल पै यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरशी झुंज दिली आहे. यानंतर हे दोघे लग्न बंधनात अडकले. लग्नाआधी पंधरा वर्षे हे दोघे एकमेकांना ओळखत होते. मात्र कॉलेज नंतर त्याचा संपर्क तुटला आणि हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञानेशेअर केलेल्या फोटोमध्ये ते समुद्रकिनारी दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून विविध पोजेस देत फोटोज शेअर केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाच्या या फोटोजने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
तर अभिज्ञाच्या चाहत्यांनी देखील तिला संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनेकांनी त्यांच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Abhidnya Bhave | television abhidnya bhave shared new photoshoot celebrating sankrant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | खाणीत पडून 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या