भारतात आल्यावर अभिनंदन यांना कराव्या लागतील ‘या’ चाचण्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका झाल्यानंतर अभिनंदन यांना भारताला सोपवण्यापूर्वी पाकिस्तानकडून त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. संपूर्ण देशात अभिनंदन यांच्या घरवापसीचा आनंद साजरा केला जात आहे. दरम्यान भारतात आल्यानंतरही पुढचे काही दिवस हे अभिनंदन यांच्यासाठी आव्हानाचे असणार आहे. कारण त्यांना काही चाचण्यांना सामाेरे जावे लागणार आहे.

त्यांना ज्या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे त्यात एक चाचणी अशी आहे की, त्यात जर अभिनंदन यशस्वी झाले नाही तर त्यांना आपली नोकरीही गमवावी लागू शकते. परंतु अभिनंदन यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची झलक आपल्याला त्यांनी सीमेपलीकडूनच दाखवून दिली आहे. त्यामुळे या चाचण्या नक्कीच यशस्वीपणे पार करतील असा विश्वास सर्वांना वाटत आहे.

भारतीय वायु सेनेच्या नियमानुसार त्यांना अनेक कठीण चाचण्या द्याव्या लगाणार आहेत. मेडिकल टेस्ट, फिटनेस टेस्ट, मनाेवैज्ञानिक आणि स्कॅनिंग चाचण्या अशा प्रकारे चांचण्यांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशी काही कार्यवाही केली आहे का ? याची पडताळणी देखील यामध्ये होईल.

मनोवैज्ञानिक चाचणी

अभिनंदन हे पाकिस्तानात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अनेक गुप्त माहितीसाठी त्यांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या त्रास दिला गेला असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून त्यांच्या मानसिकतेवर आघात केला जाण्याची शक्यता आहे. त्यांची सध्याची मानसिक स्थिती काय आहे हे पहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय वायुसेनेच्या इंटेलिजंसची डीब्रीफिंग खूप वेदना देणारी असली तरी ती वायुसेनेच्या नियमानुसार, अनिवार्यदेखील असते. दुश्मनांनी त्यांच्याकडून कोणती गुप्त माहिती काढून घेतली तर नाही ना हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. दुश्मन देशाच्या सेनेने त्यांना आपल्या बाजूने तर करुन घेतले नाही ना या शंकेचे निरसण केले जाणेही गरजेचे आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून या चाचणीला महत्त्व आहे.

अभिनंदन हे शारिरीक आणि मानसिक चाचण्यांमध्ये यशस्वी झाले तरच ते पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात. त्यांची घरवापसी झाल्यावर त्यांना काही प्रश्न विचारले जातील पण त्याच आत्मविश्वासात अभिनंदन उत्तरे देतील असा विश्वास भारतीयांना आहे. मुख्य म्हणजे अभिनंदन यांनी केलेली कामगिरी खूप मोठी आहे त्यांचा सन्मान व्हायला हवा अशीच आशा देशभरातून व्यक्त होत आहे.