Abhishek Bachchan | अभिषेक बच्चनने सांगितले पत्नी ऐश्वर्या कसा कंट्रोल करते त्याच्या राग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा गेली अनेक वर्षे चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिषेक हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अभिनेता अभिषेक बच्चन व त्यांची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची जोडी देखील खूप लोकप्रिय आहे. या कपल बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या अभिषेक हा त्याच्या ‘घूमर’ या चिपटामुळे (Ghoomer Movie) देखील चर्चेत आला आहे. ‘घूमर’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे आणि तो चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन देखील करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिषेकने (Abhishek Bachchan) त्याची बायको ऐश्वर्या ही त्याचा राग कसा घालवते हे त्याने शेअर केले आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन (Abhishek and Aishwarya) यांची जोडी लोकप्रिय जोडी आहे. अभिषेकने सांगितले आहे की त्याची बायको ऐश्वर्या ही आयुष्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींची आठवण त्याला सातत्याने करुन देत असते. आणि त्याचा राग देखील कंट्रोलमध्ये ठेवते. अभिषेक म्हणाला की, “तुम्ही घरी परत याल तेव्हा तुमची कोणत्याही गोष्टीवरुन चिडचिड होऊ शकते. तुम्ही मुंबईत असाल तर तुम्हाला ट्रॅफिकचा देखील त्रास होतो. यानंतर कधी कधी ऐश्वर्या मला समजावते की तू कशासाठी एवढा रागावतोस?  प्लीज शांत व्हा. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही आता घरी आला आहात आणि तुमचे शांत आणि आनंदी कुटुंब आहे.”

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने पुढील कोरोना काळातील देखील प्रसंग सांगितला. तो म्हणाला की, “मला आठवते की मला तिने एकदा असे काही सांगितले होते की त्या गोष्टीने मला खूप प्रभावित केले होते. कोरोनाच्या काळात एक वेळ अशी होती की मी आणि माझे वडील, माझी पत्नी आणि माझी मुलगी एका वेळी हॉस्पिटलमध्ये होतो. हळूहळू आम्हाला डिस्चार्ज मिळत होता आणि त्यांच्यापैकी मी एकटाच घरी आलो. मी जवळपास एक महिना हॉस्पिटलमध्ये होतो आणि जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा ती म्हणाली की, तुम्हाला माहीत आहे की आपण किती भाग्यवान आहोत, की आपण सर्व अजूनही एकत्र आहोत. अशी अनेक कुटुंबे आहेत जी कोविडमुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी