११ वर्षापासून फरार असलेला आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या गुन्ह्यात अकरा वर्षापासून फरार असलेला आणि पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मुंढवा येथील ताडीगुत्ता चौकातील गणपती मंदिराजवळ करण्यात आली. गजानन बाबुराव अष्टेकर (वय-३५ रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुंढवा येथील गणपती मंदिराजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर २००८ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. अकरा वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपीला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस कर्मचारी उदय काळभोर, महेश कदम, अमोल पिलाणे यांच्या पथकाने केली.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी