दहशतवाद विरोधात वापरण्यासाठी दिलेलया F-16 चा गैरवापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने आपले F-16 हे विमान भारताविरुद्ध वापरल्याबाबत अमेरिकेने पाकिस्तानला जाब विचारला आहे. अमेरिकेने पाकिस्तनाशी ‘एंड युजर’ करार केला होता.  या करारानुसार, पाकला या विमानाचा उपयोग केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात करण्याचा अधिकार अमेरिकेने दिला होता. मात्र हा नियम मोडून काढत पाकिस्तानने हे विमान भारताच्या विरोधात कारवाईसाठी वापरल्यामुळे अमेरिकेने पाकला जाब विचारला आहे.

याबाबत अमेरिकेतील राज्य विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान घडलेल्या घटनाक्रमाची आम्हाला माहिती आहे. आम्ही पाकिस्तानने केलेल्या दाव्याची पडताळणी करत आहोत. पाकिस्ताने F-16 बाबतचा करार भंग केल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. मात्र, गोपनीयतेच्या अटीमुळे आम्ही यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.

दरम्यान, बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी करीत पाकिस्तानने F-16 हे विमान भारताच्या हद्दीत आले. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी एफ-विमान पाडल्याबाबतही पाकिस्तानी लष्कराने चुकीची माहिती दिली होती. मात्र, भारताने या विमानाचे कोसळलेले काही भाग जगापुढे आणून ही बाब स्पष्ट केली होती. अमेरिकने F-16 या विमानांची निर्मिती केली असून पाकिस्ताने या विमानाद्वारे भारतीय हवाई हद्दीत घुसून भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.