ड्रग्स इंस्पेक्टर लक्ष्मीनं मागितला गळ्यातील ‘नेकलेस’, तिला मिळाल्या हातात ‘हातकडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका कारवाईत हैदराबाद आणि सिकंदराबाद येथील ड्रग्स इन्स्पेक्टर बोमीशेट्टी लक्ष्मी हिला अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी 1.1 लाख रुपयांच्या मूल्याचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून लाचेच्या स्वरूपात तिने ते स्वीकारल्याची माहिती मिळत आहे. हे दागिने स्वीकारताना तिला रंगेहाथ अटक करण्यात आली.

लक्ष्मी हिने ब्लड बँकेच्या एका प्रकरणात लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता. या ब्लड बँकेवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. सकारात्मक रीपोर्ट देण्यासाठी लक्ष्मी हिने सुरुवातीला 50 हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती.

त्यानंतर यासंदर्भात लक्ष्मी रेड्डी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर विभागाने जाळे लावत बोमीशेट्टी लक्ष्मी हिला अटक केली.दरम्यान, तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून तिला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com