पुणे महापालिकेच्या मुकादमासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर लावलेल्या नारळाच्या गाड्यावर कारवाई न करण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागून 500 रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या मुकादमासह खासगी व्यक्तीला एसीबीने रंगेहात पकडले. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55) आणि गोपी उबाळे (32) असे पकडण्यात अलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सुनील शर्मा हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम म्हणून नोकरीस आहेत. तर उबाळे हा खासगी व्यक्ती असून तो बिगारी कामे करतो. दरक्यान यातील तक्रारदार यांचा येरवडा परिसरात नारळ विक्रीचा व्यवसाय आहे. ते हातगाडी लावून नारळ विक्री करतात. दरम्यान नारळ गादीवर कारवाई न करण्यासाठी शर्मा याने 1 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास खासगी व्यक्ती उबाळे यांच्यामार्फत तडजोडीअंती 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/