SRA (झोपूप्रा)च्या ३ अभियंत्यांसह खासगी व्यक्तीविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंटीरियर डिझाऊन आणि नुतनीकरणाच्या कामाची परवानगी देण्यासाठी ६ लाखांची लाच मागितल्याप्रकऱणी अँटी करप्शनने एसआरएच्या २ अभियंत्यांसह एका खासगी व्यक्तिविरोधात लाचलचुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंता प्रल्हाद महिषी, दुय्यम अभियंता धनंजय सुर्यवंशी, उपअभियंता चंद्रशेखर दिघावकर व खासगी व्यक्ती हरिश पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

तक्रारदार यांना इंटेरियर डिझाईन आणि नुतनीकरणाच्या कामाची परवानगी देण्यासाठी वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणच्या प्रशासकिय इमारतीतील के – पुर्व विभागातील कार्यकारी अभियंता प्रल्हाद महिषी, दुय्यम अभियंता धनंजय सुर्यवंशी, उपअभियंता चंद्रशेखर दिघावकर यांनी प्रत्येकी २ लाख रुपये या हिशोबाने ६ लाख रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तडजोड करत ते साडजेचार लाख रुपयांवर तयार झाले. मात्र तक्रारदार यांची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी अँटी करप्शनने पडताळणी करून अकेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर पाटकर यांने त्यांना सहाय्य केले म्हणून चौघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.