ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB FIR On Kiran Lohar | सोलापूर जिल्हा परिषदेतील (Solapur ZP) शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. एसीबीने केलेल्या तपासात किरण लोहार यांनी 1993 ते 2022 या कार्यकाळात 112 टक्के अधिकची संपत्ती जमवल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Solapur ACB) किरण लोहार, त्यांची पत्नी व मुला विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (ACB FIR On Kiran Lohar)

किरण आनंद लोहार (वय 50 शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर) पत्नी सुजाता किरण लोहार Sujata Kiran Lohar (वय 44), मुलगा निखिल किरण लोहार Nikhil Kiran Lohar (वय 25 सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(ई), 13 (2) सहकलम भारतीय दंड संहिता कलम 109 तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (Corruption Prevention Act) सन 2018 चे कलम 13(1) (ब), 13(2) सहकलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक (PI Umakant Netaji Mahadik) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात (Sadar Bazar Police Station) फिर्याद दिली आहे. (ACB FIR On Kiran Lohar)

किरण लोहार यांनी शिक्षणाधिकारी या पदावर कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने
कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अपसंपदा
संपादित केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा 111.93 टक्के अधिक आहे. किरण लोहार यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे

(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीच्या पथकाने केली.

पुढील तपास पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार (DySP Ganesh Kumbhar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | बिघडलेल्या आरोग्य सेवेला संजय राऊतांचा ‘लेटर डोस’, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खळबळजनक आरोप!

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मानसिक छळ, 30 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल; कोथरुड परिसरातील घटना

डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना