ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | कर्ज फेड करण्यास मुदत दिल्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन 7 हजार रुपये पहिला हप्ता फोन पे वर (Bribe On PhonePe) स्वीकारणाऱ्या अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या (Ahmednagar Taluka Patsanstha Federation) विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. यासिन नासर अरब Yassin Nassar Arab (वय-42) असे लाच लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. नगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.15) अरब याच्या कार्यालयात केली. (ACB Trap Case)

याबाबत नगर तालुक्यातील भोरवाडी येथील 38 वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या. केडगाव, अहमदनगर येथून 5 लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेताना तक्रारदार यांनी त्यांच्या आई व मामाच्या नावावर असलेली त्यांची भोरवाडी शिवारातील शेत गट नं 499 मधील 1 हे. 30 आर क्षेत्र जमीन तारण म्हणून दिली होती. (ACB Trap Case)

तक्रारदार यांना पतसंस्थेकडून हे कर्जफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत देण्यात आली होती. परंतु तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही. त्यामुळे कर्जाच्या वसुली बाबत भैरवनाथ पतसंस्थेने सहायक निंबधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार कर्जाची वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन ने 25 मे 2023 रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीला तक्रारदार यांना हजर राहण्याबाबत नोटीस मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार हे सुनावणीला हजर होते. त्यादिवशी तक्रारदार यांनी फेडरेशनचे वसुली अधिकारी यासिन अरब यांना कर्ज फेड करण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली होती. अरब यांनी तक्रारदार यांना तोंडी दोन महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर कर्ज फेड मुदतवाढीसाठी फी म्हणून 23 ऑगस्ट 2023 रोजी एक हजार रुपये फी मागितली. तक्रारदार यांनी अरब यांच्या फोन पे ला पैसे पाठवले. मात्र तक्रारदार यांना कोणतीही शासकीय पावती दिली नाही. (Ahmednagar ACB Trap Bribe Case)

त्यानंतर तक्रारदार यांनी 31ऑगस्ट 2023 रोजी भैरवनाथ पतसंस्थेचे सर्व कर्ज फेडले. पतसंस्थेने कर्ज निल दाखला तक्रारदार यांना दिला होता. त्यानंतर दिनांक 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान अरब यांनी तक्रारदार यांना वारंवार मोबाईल कॉल करून मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली. तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही तुला मदत केल्याच्या मोबदल्यात तू मला 30 हजार रुपये दे, अशी लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी 7 सप्टेंबर रोजी अहमदनगर कार्यालयात तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने 7 व 8 सप्टेंबर रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यासिन अरब यांनी तक्रारदार यांचे कडे 30 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20 हजार रुपये लाच मागणी करून पहिला हप्ता म्हणून 7 हजार रुपये लाच रक्कम प्रथम स्वीकारण्याचे व पुढील दोन दिवसानंतर 13 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार 8 सप्टेंबर रोजी सापळा आयोजित करण्यात आला असता अरब यांनी तक्रारदार यांचेकडून
रोख स्वरूपात लाच स्वीकारली नाही. त्यांनी लाचेची रक्कम फोन पे वर पाठवण्यास सांगितले.
आज (शुक्रवार) अरब याच्या कार्यालयात सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती.
तक्रारदार यांच्या फोन पे वरून सात हजार रुपये लाचेची रक्कम अरब यांच्या फोन पे वर सेंड करण्यात आली असता अरब यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अरब याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक,पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
अहमदनगर एसीबी पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे,
पोलीस निरीक्षक राजू आल्हाट पोलिस अंमलदार रमेश चौधरी, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक,
वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हरुन शेख, चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना