Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्डांद्वारे (Credit Cards) फसवणुकीचे (Cheating Case) प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. एका व्यक्तीला क्रेडिट कार्डची ई-केवायसी (E-KYC) केली नसल्याचे सांगून दंड भरावा लागेल असे सांगून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत संतोष शिवाजी सरगर (वय-42) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 916289779270 मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका मोबाइल धारकाने फिर्यादी यांना फोन करुन त्यांच्या क्रेडिट कार्डची ई-केवायसी केली नसल्याचे सांगितले. ई-केवायसी केली नसल्याने तुम्हाला 4500 रुपयांचा दंड भरावा लागेल असे खोटे सांगितले. तसेच एक लिंक पाठवून त्यावर माहिती व ओटीपी टाकण्यास सांगितले. ओटीपी टाकल्यानंतर फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवरुन परस्पर 45 हजार 675 रुपये कट झाले. फसवणूक (Fraud Case) झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना

Pune Cyber Crime | ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने 35 लाखांची फसवणूक,
पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला मुंबईतून केली अटक

शुक्रवार पेठ: सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

Travels Ticket | तिकीट दरवाढ ! सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केली दुप्पट भाडे वाढ