ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | दिराच्या मृत्युनंतर मृत्युपत्रा नुसार दिराचे नावे असलेली जमीन तक्रारदार यांच्या नवाने फेरफार करुन देण्यासाठी 18 हजार रुपये लाच स्वीकारताना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गिधाडी मंडळ कार्यालय मोहाडी येथील तलाठी व कोतवाल यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहाथ पकडले. एसबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.28) केली. (ACB Trap Case News)

मधुकर नकटु टेम्भुर्णीकर Madhukar Naktu Tembhurnikar (वय 55 तलाठी त.सा.क्र 13 ,गीधाडी, मंडळ कार्यालय मोहाडी,ता गोरेगाव जिल्हा गोंदिया रा.गायत्री मंदिरासमोर हीरापुर रोड, गोरेगाव जि. गोंदिया), राकेश संपत वालदे Rakesh Sampat Valde (वय 38 वर्ष पद कोतवाल, तलाठी कार्यालय गिधाडी रा. गिधाडी ता.गोरेगाव जि.गोंदिया) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत गिधाडी ता. गोरेगाव येथील 62 वर्षाच्या महिलेने गोंदिया एसीबीकडे तक्रार केली आहे. (ACB Trap Case News)

तक्रारदार या शेतकरी असून तक्रारदार यांचे पतीला 3 भाऊ व 4 विवाहित बहीणी आहेत. तक्रारदार यांच्या दिराचे लग्न झाले नसून तक्रारदार यांच्याकडे राहण्यास होते. त्यांनी आजारपणामुळे त्यांची गिधाडी भु.क्र. 1 खा.क्र 357 मध्ये असलेली 1 हेक्टर शेती तक्रारदार यांचे नावाने मृत्युपत्र लेखा अन्वये 15 नोव्हेंबर 2022 रोजी लिहून देऊन दुय्यम निबंधक कार्यालय गोरेगाव येथे दस्त क्र 1676 प्रमाणे नोंदणी करुण दिली आहे.

तक्रारादार यांच्या दिराच्या मृत्युनंतर मृत्युपत्रा नुसार दिराचे नावे असलेली जमीन तक्रारदार यांच्या नवाने फेरफार होण्याकरीता मार्च 2023 मध्ये तलाठी कार्यालय येथे कागदपत्रे दिली होती. फेरफार करुन देण्याकरीता तलाठी मधुकर टेम्भुर्णीकर यांनी कोतवाल राकेश वालदे यांच्या मार्फत 20 हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती 18 हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदार यांनी याबाबत हिंगलो एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता,
तलाठी मधुकर टेम्भुर्णीकर यांनी कोतवाल राकेश वालदे यांच्या मार्फत 20 हजार रुपये
लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 18 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने गुरुवारी सापळा रचला. लाचेची रक्कम कोतवाल वालदे याने तलाठी टेम्भुर्णीकर
यांच्या समोर स्वीकारली असता पथकाने रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम,
अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, वाचक पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे
यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया एसीबी पोलीस उप अधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले,
पोलीस हवालदार अतुल तवाड़े, विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर,
संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे,
चालक दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे, माजी आमदार रमेश कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Pune Manache Ganapati Visarjan-2023 | पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचे विसर्जन