Pune Manache Ganapati Visarjan-2023 | पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचे विसर्जन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Manache Ganapati Visarjan-2023 | पुण्यासह संपूर्ण राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन पूर्ण झाले आहे. यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. (Pune Manache Ganapati Visarjan-2023 )

दरवर्षीप्रमाणे मंडई येथील टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष करण्यात आला. (Pune Manache Ganapati Visarjan-2023 )

  1. मानाचा पहिला कसबा गणपती (Kasba Ganpati)

सकाळी मंडई चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती 10 वाजून 15 मिनिटांनी झाल्यानंतर बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मिरवणूक मार्गस्थ झाली. प्रभात बँड, कामायनी प्रशाला, रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ही ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. मानाचा पहिला गणपतीचे नदी पात्रातील हौदात पारंपारिक पद्धतीने 4 वाजून 10 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

  1. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती (Tambdi Jogeshwari Ganpati)

पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वाजता सुरु झाली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची मिरवणुक पारंपरिक पालखीमधून टिळक चौक, बेलबाग चौक तेथून पुढे अलका टॉकीज चौकाच्या दिशेने न्यू गंधर्व ब्रास बँड,शिवमुद्रा आणि ताल ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थ झाली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 4 वाजून 43 मिनिटांनी विसर्जन

  1. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती (Guruji Talim)

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला 12 वाजता सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण करण्यात आली. फुलांच्या ‘रामराज्य’ रथात पुण्याचा राजा विराजमान झाले होते. पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन 5 वाजून 40 मिनिटांनी करण्यात आलं. पाचांळेश्वर घाटावर या गणपतीला निरोप देण्यात आला.

  1. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती (Tulshibaug Ganpati)

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘महाकाल’ रथामधून दुपारी एक वाजता काढण्यात आली. तुळशीबाग ढोल ताशा पथकाकडून शिव तांडव वादन सादर करण्यात आले.
शंकराच्या जटा परिधान करत तुळशीबाग मंडळाचे कार्यकर्ते बेलबाग चौकात आले होते.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झाले.
डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं.

  1. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती (Kesari Wada Ganpati)

पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सकाळी 11 वाजता सुरूवात झाली.
मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला आठ तास लागले.
पाचवा केसरीवाडा गणपतीचं सायंकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे, माजी आमदार रमेश कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली