ACB Trap News | 4 हजार रुपये लाच घेताना तांत्रिक अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मस्टर प्रमाणे बिल मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सोयगाव तालुक्यातील अमखेडा ग्रामपंचायतीचा तांत्रिक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. सचिन नानासाहेब रोटे Sachin Nanasaheb Rote (वय 30) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या तांत्रिक अधिकाऱ्याचे (Technical Officer) नाव आहे. औरंगाबाद एसीबीच्या (ACB Trap News) पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.7) केली.

याबाबत 35 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत विहिर मंजूर झाली आहे. मंजूर झालेल्या विहिरीचे मजुरीचे मस्टर प्रमाणे बिल मंजूर (Bill Approved) करण्याकरिता प्रतिमस्टर एक हजार रुपये या प्रमाणे पाच मस्टरचे पाच हजार रुपयांची मागणी तांत्रिक अधिकारी सचिन रोटे याने केली. तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी यासंदर्भात औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली. पथकाने पडताळणी करुन शुक्रवारी सापळा रचुन रोटे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर (DySP Rajeev Talekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील (DySP Sangeeta Patil), पोलीस अंमलदार शिरीष वाघ, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

Web Title :   ACB Trap News | ACB Arrested Sachin Nanasaheb Rote In Bribe Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | मित्राचे अपहरण करून लॉजवर डांबून ठेवून खंडणी मागणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune PMC Employees | निवृत्त होतानाच कर्मचार्‍यांना पीएफ, शिल्लक रजेचे पैेसे आणि लगेचच पेन्शन सुरू करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करणार: महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Maharashtra Politics News | शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांना भेटण्यासाठी धरडप, पण…; अमोल कोल्हेंचा मोठा दावा (व्हिडिओ)

Pradeep Deshmukh | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

Alaya F | अभिनेत्री अलाया एफच्या हॉट ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील फोटोने वाढवले इंस्टाग्रामचे तापमान