ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 10 हजार रूपयाची लाच घेणार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) रंगेहाथ पकडले आहेत (Dhule ACB Trap Bribe Case) . त्यांच्याविरूध्द नाशिक जिल्हयातील (Nashik) चांदवड पोलिस स्टेशनमध्ये (Chandwad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

पोलिस हवालदार हरी जानु पालवी Police Havaldar Hari Janu Palvi (बक्कल नं. 429, नेमणुक – चांदवड पोलिस स्टेशन, जि. नाशिक) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे मौजे पिंपळगाव दाभडी (ता. चांदवड) येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार व त्यांच्या भावाची मौजे रायपुर (ता. चांदवड) येथे शेत जमीन आहे. शेत जमीनीतील एका सामाईक रस्त्याच्या वहिवाटीवरून त्यांच्या भावा-भावांमध्ये वाद व हाणामारी होवुन त्यांच्यात परस्पर विरोधी गुन्हे चांदवड पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. (ACB Trap News)

तक्रारदार यांच्या वतीने त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्हयात आरोपींविरूध्द वाढीव कलम लावुन आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस हवालदार हरी जानु पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराने दुरध्वनीव्दारे अ‍ॅन्टी करप्शन विभागास माहिती दिली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळा रचला असता पोलिस हवालदार हरी जानु पालवी यांनी
गणुर चौफुली येथील अमृततुल्य चहाच्या दुकानावर तडजोडीअंती 10 हजार रूपयाची लाच घेतली.
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar), धुळे विभागाचे पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील
(DySP Abhishek Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण (Manjit Singh Chavan),
पोलिस राजन कदम, पोलिस शरद काटके, पोलिस संतोष पावरा, पोलिस रामदास बारेला, पोलिस गायत्री पाटील,
(Police Bhushan Shete) पोलिस भुषण शेटे, पोलिस भुषण खलाणेकर, पोलिस मकरंद पाटील, पोलिस प्रविण पाटील, पोलिस रोहिणी पवार,
पोलिस वनश्री बोरसे, पोलिस प्रशांत बागुल, पोलिस जगदीश बडगुजर आणि पोलिस सुधीर मोरे यांच्या पथकाने
ही कारवाई केली.

Advt.

Web Title : ACB Trap News | Anti Corruption Bureau (ACB) Dhule Nashik Arrest Police Havaldar Hari Janu Palvi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस : वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती