ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : सातारा जिल्हा न्यायालयातील वकिल 1 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | सातारा जिल्हा न्यायालयातील (Satara District Court) वकिलास 2 लाखाच्या लाचेची मागणी करून 1 लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) पथकाने सोमवारी (दि.15) रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Satara ACB Trap News). 1 लाख रूपयाची लाच घेताना वकिलास रंगेहाथ पकडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap News)

विलास बाळकृष्ण कुलकर्णी Adv Vilas Balkrishna Kulkarni (खाजगी वकिल, जिल्हा न्यायालय सातारा, जि. सातारा) असे एक लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे (Satara Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे स्वातंत्र्य संग्राम शिक्षण संस्थेचे (Swatantra Sangram Shikshan Sanstha Satara) अध्यक्ष आहेत. संस्थेच्या वतीने सातारा येथील दिवाणी न्यायालयात (Civil Court Satara) प्रोबेट अर्ज क्र 16/2020 चा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेणेकरिता लोकसेवकावर प्रभाव पाडून वकिल विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी (Satara Bribe Case) केली. (ACB Trap News)

तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सातारा अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी अ‍ॅड. विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 1 लाख रूपयाची लाच घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

 

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य
(DySP Ujjwal Vaidya) , पोलिस अंमलदार निलेश येवले (Police Nilesh Yewale),
पोलिस अंमलदार तुषार भोसले (Police Tushar Bhosale) आणि महिला पोलिस शितल सपकाळ
(Police Sheetal Sapkal) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :- ACB Trap News | Anti-Corruption Bureau Maharashtra : Satara district court lawyer caught in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरी करणार्‍यास अटक, 5 गुन्हे उघडकीस

Maharashtra Political Crisis | भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं;
म्हणाले-‘नियुक्ती बेकायदेशीर असली तरी ते…’

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला
मास्टर प्लान (व्हिडिओ)