ACB Trap News | सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा वेल्हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावकारी लायसन्स (Moneylending License) मिळवण्यासाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन तसेच पाठपुरावा करण्यासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा (Demand a Bribe) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वेल्हे येथील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) अटक केली आहे. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.16) केली आहे. पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर (Clerk Pandharinath Machhindranath Tamnar) असे लाच मागणाऱ्या (ACB Trap News) लिपीकाचे नाव आहे.

तक्रारदार यांना सावकारी लायसन्स काढायचे होते. या कामासाठी ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या वेल्हे येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी लिपीक पंढरीनाथ तमनर यांनी लायसन्ससाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीच्या कार्यालयात (ACB Trap News) तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने 29 मे रोजी पडताळणी केली असता, पंढरीनाथ तमनर यांनी सावकारी लायसन्ससाठी
लागणारा प्रस्ताव तयार करुन, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरवा करुन लायसन्स मिळवून देण्यासाठी
30 हजार रुपये व स्वत:साठी 20 हजार असे एकूण 50 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
लाच मागिल्याप्रकरणी पुणे एसीबीने वेल्हे पोलीस ठाण्यात (Velhe Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत
(Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन पंढरीनाथ तमनर याला अटक (Arrest) केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे (PI Sandeep Varhade) करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या पथकाने केली.

Web Title :  ACB Trap News | Clerk of Velhe Assistant Registrar Office arrested by ACB for demanding Rs 50,000 bribe for moneylender license work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shasan Aplya Dari | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | पुणे : निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

CM Eknath Shinde | ‘असा मुख्यमंत्री कधी पाहिलाय का? जे बोलतो ते…’ – एकनाथ शिंदे (व्हिडिओ)