ACB Trap News | जप्तीच्या वॉरंटची बजावणी करण्यासाठी लाचेची मागणी; लाच घेताना तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | बिल्डरला जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना कर्जत तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. रवी दशरथराव सोनकांबळे (वय-45 रा.ठि. अरिहंत टॉवर, पहिला मजला, सी विंग, खोली क्रमांक 103, खोपोली, ता. खालापूर जि. रायगड) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. रायगड एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.11) केली. (ACB Trap News)

याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने रायगड एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी महारेरा या ठिकाणी बिल्डर विरुद्ध तक्रार करून 13 लाख 91 हजार 135 एवढ्या रकमेचे जप्ती वॉरंट प्राप्त केले होते. या जप्तीच्या वॉरंटची बजावणी करण्याकरिता दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी जप्ती वॉरंट जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड या ठिकाणी जमा केले होते. या जप्ती वॉरंटची बजावणी करण्याकरिता कर्जत तहसील कार्यालयात पाठविण्यात आलेले होते. या जप्ती वॉरंटची बजावणी करण्याकरिता रवी सोनकांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडून 20 रुपये स्वीकारले होते व पुन्हा आज 10 हजार रुपये लाच मागितली. (ACB Trap News)

तक्रारदार यांनी याबाबत रायगड एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता जप्तीचे वॉरंट बजावणी करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयातील अव्वल कारकडून रवी सोनकांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाच मागितल्यचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच स्वीकारताना रवी सोनकांबळे याला रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे करीत आहेत.

ही कारवाई एसीबी, ठाणे परिक्षेत्र पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे,
अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे
पोलीस अंमलदार अरुण करकरे, विनोद जाधव, शरद नाईक, महेश पाटील यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”