ACB Trap News | दुर्देवी ! मुलीच्या पहिलीच्या अ‍ॅडमिशनसाठी लाच घेणारा मुख्याध्यापक, लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | मुलीच्या पहिलीच्या अ‍ॅडमिशनसाठी सुरूवातीला 7 हजार 500 रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4 हजार रूपयाची लाच घेणार्‍या मुख्याध्यापकास आणि लिपीकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द नानलपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद Mohd Abdul Rafi Mohd Abdul Rashid (54, पद – कनिष्ठ लिपीक, बाल विद्या मंदिर माध्यमिक शाळा, नानलपेठ शाखा, परभणी. रा. भोई गल्ली, परभणी – Parbhani ACB Trap) आणि एकनाथ कच्छवे Eknath Kachhave (57, पद – मुख्याध्यापक, बाल विद्या मंदिर (प्राथमिक), नानलपेठ शाखा, परभणी. रा. जुना पेडगाव रोड, परभणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (ACB Trap News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मुलीला पहिलीच्या वर्गात प्रवेश हवा होता. त्यासाठी मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे आणि लिपिक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद यांनी त्यांच्याकडे दि. 28 जून 2023 रोजी 7 हजार 500 रूपयाची मागणी केली. दि. 28 जून 2023 रोजी तक्रारदार यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मुख्याध्यापक आणि लिपिकाने तडजोड करून 5 हजार 500 रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Parbhani Bribe Case)

 

लाचेच्या रक्कमेपैकी 4 हजार रूपये दि. 3 जुलै 2023 रोजी लिपिक मोहमद अब्दुल रफी मोहमद अब्दुल रशीद यांनी मुख्याध्यापक एकनाथ कच्छवे यांच्या सांगण्यावरून घेतले तसेच उर्वरित 1 हजार 500 रूपये दोन महिन्यांनंतर आणुन देण्यास सांगितले.

लाचेची रक्कम घेतल्यानंतर लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले तर त्यानंतर मुख्याध्यापकास
देखील अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
(Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde), पोलिस उप अधीक्षक अशोक इप्पर
(DySP Ashok Ipper) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे
(PI Basaveshwar Jarikore), पोलिस अंमलदार मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार,
अतुल कदम, मोहम्मद जिब्राईल यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title : ACB Trap News | Durdevi! Principal who took bribe for girl’s first admission, clerk in anti-corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Triphala Benfits | आतड्यांची घाण स्वच्छ करते त्रिफळा, ‘हे’ फायदे जाणून हैराण व्हाल तुम्ही

Pune Crime News | वानवडी, हडपसर, महंमदवाडी रोड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या विराज यादवसह त्याच्या
6 साथीदारांवर ‘मोक्का’ (MCOCA)

Neem Leaves | आरोग्यासाठी चमत्कारी आहेत ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर होईल नष्ट,
‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये