ACB Trap News | शेतकऱ्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (MGNREGA) अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करुन विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता 5 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नंदुरबार पंचायत समितीमधील (Nandurbar Panchayat Samiti) विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) अटक केली आहे. भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे Bhaiyasaheb Digambar Nikumbhe (वय-53) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) सोमवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीजवळ केली.

 

याबाबत रनाळे खुर्द येथील 55 वर्षीय शेतकऱ्याने नंदुरबार एसीबीकडे (Nandurbar ACB Trap) तक्रार केली आहे. यातील तक्रारदार यांचे रनाळे खुर्द शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजुरीचा (Well Approval) प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. (ACB Trap News)

 

तक्रारदार यांनी याबाबत नंदुरबार एसीबीकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी 12 जून रोजी पडताळणी केली. त्यावेळी विस्तार अधिकारी (Extension Officer) भैय्यासाहेब निकुंभे याने पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकराताना नुकुंभे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी (DySP Rakesh Chaudhary),
पोलिस निरीक्षक समाधान महादू वाघ (PI Samadhan Mahadu Wagh)
पोलीस अंमलदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील,
संदीप नावाडेकर, देवराम गावित, मनोज अहिरे, अमोल मराठे जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :  ACB Trap News | extension officer arrested for accepting bribe of five thousand in nandurbar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BMC Corruption News | कॅगच्या अहवालानंतर आता एसआयटीची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 14 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, मुंढवा, खडकी, अलंकार,
वारजे, उत्तमनगर, खडक, कोरेगाव पार्कमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नियुक्ती

Pune Karve Road Traffic Updates | कर्वे रस्त्यावर ‘बॉटलनेक’चा परिसर सोडून दुतर्फा पार्किंग व्यवस्था !