ACB Trap News | 3 हजाराची लाच घेणार्‍या ग्रामसेवकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

लातूर : पोलीसानामा ऑनलाइन – ACB Trap News | सिंचन विहीर मंजूर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी 3 हजार रूपयाची लाच घेणार्‍या ग्रामसेवकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Nanded) रंगेहाथ पकडले आहेत (Latur ACB Trap). त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द चाकूर पोलिस स्टेशनमध्ये (Chakur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

परशुराम पंढरी गायकवाड Parashuram Pandhari Gaikwad (50, पद – ग्रामसेवक, नेमणूक – पंचायत समिती चाकूर, ग्रामपंचायत – बोधी, ता. चाकूर, जि. लातूर. रा. शाहूनगर, थोडगा रोड, अहमदनगर, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. (ACB Trap News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना त्यांचा एमजीनरेगा अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकुर येथे दाखल केल्याचा मोबदला तसेच यापुढे सिंचन विहीर मंजूर होण्यासाठी च्या कामात मदत करण्यासाठी म्हणून ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांनी पंचासमक्ष 3,000 रुपये लाचेची मागणी केली.

 

त्याप्रमाणे थोड्याच वेळाने तक्रारदार आलोसे ग्रामसेवक गायकवाड यांना चाकुर बस स्टँड येथील कॅन्टीन मध्ये लाच मागणी केलेली रक्कम 3,000 रुपये देण्यासाठी गेले असता आलोसे गायकवाड यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वतः स्विकारली. आरोपीस लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (Latur Bribe Case)

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde),
पोलिस उप अधीक्षक पंडित रेजितवाड (DySP Pandit Rejitwad )
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्वर मुजावर (Police Inspector Anwar Mujawar) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

 

Web Title :  ACB Trap News | Gram sevak Parashuram Pandhari Gaikwad who took bribe of
3 thousand was arrested by anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा