ACB Trap News | Latur : निलंगा येथील तलाठी 3 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील (Latur Nilanga ACB Trap News) सज्जा केळगाव येथील तलाठ्याने (ACB Trap On Talathi) 6 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 3 हजाराची लाच घेतली. त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द निलंगा पोलिस स्टेशनमध्ये (Nilanga Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

भिमराव निलाप्पा चव्हाण Bhimrao Nilappa Chavan (47, पद – तलाठी, नेमणूक – सज्जा केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांचे ताब्यात राठोडा ता. निलंगा या गावात 80 आर कुळाची जमीन आहे. (Latur Nilanga Crime News)

 

त्या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीसपत्राच्या आधारे विरोधी पार्टीने फेरफार नोंदविण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केलेला होता (Latur Nilanga Bribe Case). यातील तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी सदर अर्जास आक्षेप नोंदविण्याची तलाठ्याकडे तक्रार केली असता तक्रारदार यांचे तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून तक्रारदाराच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी आलोसे तलाठी भिमराव चव्हाण यांनी तक्रारदारास पंचासमक्ष सुरुवातीस 6,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3,000/- रुपये लाचेची मागणी केली. (ACB Trap News)

 

त्याप्रमाणे थोड्याच वेळाने तक्रारदार आलोसे चव्हाण यांचे निलंगा येथील तलाठी कार्यालयात मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000/- रुपये देण्यासाठी गेले असता आलोसे चव्हाण यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वतः स्विकारली.
आरोपीस लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde),
पोलिस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (DySP Pandit Rejitwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli) आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :  ACB Trap News | Latur Nilanga ACB Arrest Talathi Bhimrao Nilappa Chavan In
Bribe Case Of Three Thousands Demand of 6000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा