Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | मानपाडा पोलीस ठाण्याचे (Manpada Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Sr PI Shekhar Bagde) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On Sr PI Shekhar Bagde) यांनी पत्रकार परिषदेत शेखर बागडे याचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच बागडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची (Unaccounted Assets Of PI Shekhar Bagde) यादी वाचून दाखवली. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. ही क्लिप शेखर बागडे यांची असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. तसेच कशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होत आहे, याबाबत आव्हाड यांनी ट्विटमध्ये दावे केले आहेत. (Jitendra Awhad On PI Shekhar Bagde)

 

अजित पवारांच्या आरोपांमुळे तर्क-वितर्कांना उधाण

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शेखर बागडे यांचा उल्लेख केला. बागडे ठाणे जिल्ह्यात (Thane Police) काम करतोय, त्याने मोठी मालमत्ता निर्माण केली आहे. एक पोलीस एवढी मालमत्ता कशी काय गोळा करु शकतो? सरकारने याबाबत गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शेखर बागडे यांच्या मालमत्तेची यादी वाचून दाखवली.

 

 

ऑडिओ ऐकण्यासाठी क्लिक करा

 

 

 

‘मी त्यांना फाट्यावर मारतो’ हे त्याचे आवडते विधान

दरम्यान, अजित पवार यांनी शेखर बागडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन सविस्तर भूमिका मांडली आहे. शिवसेना (Shivsena), भाजपामध्ये (BJP) ज्या गोष्टीवरुन ठाण्यामध्ये वाद सुरु आहे; तो मानपाडा येथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे याच्यामध्ये प्रचंड पैशाचा उन्माद आहे. ‘मी त्यांना फाट्यावर मारतो’ हे त्याचे आवडते विधान. पैशाच्या मग्रुरीमुळे आपण कोणालाही विकत घेऊ शकतो हे त्याच्या डोक्यामध्ये फिट बसले आहे. आज अजित पवार यांनी त्याची प्रॉपर्टी वाचून दाखवली ही प्रॉपर्टी त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीच्या 20 टक्के पण नाही. अजून तर त्याची खूप प्रॉपर्टी इकडे-तिकडे पसरलेली आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (Jitendra Awhad On PI Shekhar Bagde)

 

जबरदस्तीने पार्टनरशिप घेतली

खालापूर येथे एक फूड कोर्ट पेट्रोल पंप (Food Court Petrol Pump) जे MSRDC ने ज्याच्या नावावर दिले होते त्याच्याकडून जबरदस्तीने पार्टनरशिप घेऊन त्याला चेक देऊन आणि नंतर त्या चेकचा व्यवहार पूर्ण न करता ते फुड कोर्ट पेट्रोल पंप आणि त्याच्या आजूबाजूची सगळी जागा शेखर बागडे ने बळकावली आहे. प्रचंड दादागिरी करुन मूळ मालकास तेथे येण्यासही मज्जाव केला आहे. तो मूळ मालक तेथे गेल्यास स्थानिक पोलीसच त्या मूळ मालकाला अटक करतात. कारण बागडे साहेबांचा एरीया आहे. असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दिवसाला 20 ते 25 लाखांची कमाई

तिथे बाऊन्सर बसवले आहेत. तिथे गुंडांची ये-जा सुरु असते. आणि दिवसाला जवळ-जवळ 20 ते 25 लाख रुपयांची कमाई तिथे होते.
पेट्रोल पंपाचा चेक आणि सीसीडेचा चेक हा अधिकृत असल्याने मूळ मालकाच्या खात्यावर जातो. उर्वरीत संपूर्ण रोख पैसे बागडे
आपल्या घरी घेऊन जातो. ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर लोन आहे. त्या लोनचा EMI मात्र त्या गरीबाला भरावा लागतो.

 

पोलीस दखल घेतात पण…

पोलीसांकडे अनेक तक्रार येतात. पोलीस त्याची दखल देखलही घेतात, शेवटपर्यंत जातात देखील; परंतु त्यांना वरुन फोन येतो.
आता वरुन फोन कोणाचा येतो हे देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वेगळ सांगायला नको.
अशा या शेखर बागडे बद्दल अजित पवार यांनी त्याच्या अनधिकृत संपत्ती बद्दल विषय काढला.
त्यामुळे मी ही अधिकची माहिती महाराष्ट्राला देत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या शेवटी म्हटले आहे.

 

Web Title :  Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | NCP MLA jitendra awhad targets cm eknath shinde
devendra fadnavis on senior police inspector shekhar bagde Unaccounted Assets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा