ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | परभणी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील (Parbhani Civil Hospital) डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Certificate of Disability) काढून देण्यासाठी 3 हजार रूपयाची लाच PhonePe घेतल्यानंतर आणखी पैशांची मागणी करून 2 हजार रूपयाची लाच (Parbhani Bribe Case) कॅश स्वरूपात घेताना एकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Parbhani ACB Trap News). त्याच्याविरूध्द नानलपेठ पोलिस स्टेशनमध्ये (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

 

विष्णू बापूराव कोरडे Vishnu Bapurao Korde (32, व्यवसाय – खाजगी नौकरी, रा. ठाकरे नगर (Thackeray Nagar Parbhani), परभणी, जि. परभणी) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णु कोरडेने तक्रारदारास त्याची परभणी येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगितले (Parbhani Crime News). तक्रारदारास अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्याकरिता कोरडेने यापुर्वीच फोन पे व्दारे 3 हजार रूपये घेतले. त्यानंतर देखील त्याने 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap News)

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 14 जून 2023 रोजी विष्णु कोरडेने सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 2 हजार रूपये लाच म्हणून घेतले आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणखी 5 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने विष्णु कोरडेला रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली आहे.

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde),
पोलिस उप अधीक्षक अशोक इप्पर (DySP Ashok Ipper)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे (Police Inspector Basaveshwar Jarikore),
पोलिस अंमलदार मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार,
मो. जिब्राईल, राम घुले, पोलिस हवालदार चालक कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | PhonePe extorted bribe by pretending to be a doctor in a government hospital;
Caught red-handed while taking ‘cash’ during a trap operation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा