ACB Trap News | लाच घेताना नायब तहसीलदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रास्त भाव धान्य दुकानाच्या धान्य मागणी पत्रावर सही करण्यासाठी 9 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) उमरगा तहसील कार्यालयातील (Umarga Tehsil Office) नायब तहसीलदार Naib Tehsildar (पुरवठा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहात पकडले. राजाराम इरण्णा केलुरकर Rajaram Eranna Kelurkar (वय – 56 रा. श्री आई निवास, लक्ष्मी धाम कॉलनी, लातुर (तत्कालीन नायब तहसीलदार, पुरवठा, उस्मानाबाद. सध्या नेमणूक तहसील कार्यालय उमरगा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि. 7) केली.

याबाबत 48 वर्षाच्या व्यक्तीने उस्मानाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार व त्यांच्या दोन मित्रांचे रास्त भाव धान्य दुकान आहे. दुकानाच्या धान्य मागणी पत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी राजाराम केलुरकर यांनी तिघांचा 3 महिन्याचा मासीक हप्ता असे एकुण 9 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी उस्मानाबाद एसीबीकडे (Osmanabad ACB Trap News) तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये धान्य मागणीपत्रावर सही
करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी राजाराम केलुरकर याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना केलुरकर याला गुरुवारी रंगेहात पकडले. त्याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद एसीबी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre)
पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अ‍ॅक्शन मोडवर, 10 लाखाची लाच घेणार्‍या बडया अधिकार्‍याची हकालपट्टी