ACB Trap News | लाच स्वीकारताना वरिष्ठ अणुजीव सहाय्यक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल अनुकुल देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) नाशिक जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील (Nashik District Health Laboratory) वरिष्ठ अणुजीव सहाय्यकाला (Senior Nuclear Assistant) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. वैभव दिगंबर सादिगले (Vaibhav Digambar Sadigale) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई मंगळवारी (दि.29) केली.

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबी (ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था तसेच इतर तीन संस्थांचा केटरिंग व्यवसाय करतात. केटरिंग व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणाचे एकुण चार नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या चार पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करुन त्याचा अहवाल अनुकुल देण्यासाठी वैभव सादिगले यांनी प्रत्येक पाणी नमुन्याचे 500 प्रमाणे चार नमुन्याचे दोन हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबी (Nashik ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली.
प्राप्त तकारीची पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता वैभव सादिगले याने तक्रारदार यांच्याकडे लाच
मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना सादिगले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक मीरा आदमाने (PI Meera Adamane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती