ACB Trap News | 4 लाखांची लाच घेताना उपविभागीय बांधकाम अभियंत्याला एसीबीकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | शासकीय योजनेच्या (Government Scheme) माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाचे अतिरिक्त सुरक्षा अमानत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) उपविभागीय बांधकाम अभियंत्याला (Sub Divisional Construction Engineer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.16) रात्री करण्यात आली आहे. लाच घेताना पकडण्यात आलेल्या अभियंत्याच्या नाशिकसह धुळ्यातील घरी पथकाने (ACB Trap News ) झडती सुरु केली आहे.

ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते Dnyaneshwar Pandharinath Vispute (वय -57 पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, वर्ग-1, ता.चाळीसगाव , जिल्हा- जळगाव रा. अशोक नगर, धुळे ता.जिल्हा धुळे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nshik ACB Trap) तक्रार केली आहे.

तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी ‘डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ (Dr. Shama Prasad Mukherjee Rurban) या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचखोर ज्ञानेश्वर विसपुते याने 5 लाख रुपये लाचेची मागणी शनिवारी केली. तडजोडी अंती चार लाख (ACB Trap News ) देण्याचे ठरले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबी (Nashik ACB News) कडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला.
लाचखोर विसपुते याने शहरातील गडकरी चौक परिसरात 4 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली.
त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने विसपुते यास रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Additional SP Madhav Reddy),
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DSP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत (PI Swapnil Rajput)
पोलीस अंमलदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दरोड्याच्या गुन्ह्याचा दोन तासात छडा, येरवडा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक