ACB Trap On API Swapnil Masalkar | तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजाराची लाच स्वीकारताना एपीआय एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On API Swapnil Masalkar | तक्रार अर्जावरुन गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी 70 हजाराची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) खार पोलीस ठाण्यातील (Khar Police Station) सहायक पोलीस निरीक्षकला (API) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) सापळा रचून अटक केली. स्वप्निल बबनराव मासळकर Swapnil Babanrao Masalkar (वय-35) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या एपीआयचे नाव आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) सोमवारी (दि.30) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. (ACB Trap On API Swapnil Masalkar)

याबाबत तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap Mumbai) तक्रार केली होती. एपीआय स्वप्निल मासळकर याच्या विरुद्ध खार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई एसीबीने (Mumbai ACB) केलेल्या या कारवाईमुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात खळबळ उडाली आहे. (ACB Trap On API Swapnil Masalkar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीच्या इमारतीला मुंबई महापालेकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी इमारतीच्या आजूबाजूस लोखंडी पत्रे लावले आहेत. यामुळे इमारतीमधील दुकानदारांना दुकानामध्ये ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर प्रतिबंध होत असल्याची तक्रार दुकानदारांनी खार पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारी अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यासाठी स्वप्निल मासळकर याने तक्रारदार यांच्याकडे 80 हजार रुपये लाच मागितली.

 

तडजोडीमध्ये 70 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 28 मे रोजी पडताळणी केली असता आरोपी स्वप्निल मासळकर याने 70 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 70 हजार रुपये लाच स्वीकारताना स्वप्निल मासळकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title : ACB Trap On API Swapnil Masalkar | ACB Cought API Swapnil Babanrao Masalkar Khar Police Station Mumbai 70 thousands Bribe Case Mumba News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त