ACB Trap On Ganesh Jadhav | अवैध वाळू वाहतूकीसाठी 1,50,000 ची लाच घेताना तहसीलदारासह खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

लातुर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Ganesh Jadhav | निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा (Illegal Sand Extraction) करुन त्याची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याऐवजी वाळु माफियांशी (Sand Mafia) हातमिळवणी करत दीड लाखाची लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) निलंगा येथील तहसीलदाराला (Nilanga Tehsildar) आणि खासगी व्यक्तीला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Latur)  रंगेहात पकडले.  तहसीलदार गणेश दिगंबरराव जाधव (Ganesh Digambarrao Jadhav) आणि खासगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे (Ramesh Gunderao Mogarge) यांना लातुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई तहसीदार यांच्या घरासमोर करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Ganesh Jadhav)

 

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap On Ganesh Jadhav) तक्रार केली आहे.  त्यानुसार पथकाने 26, 28, 30 मे आणि 31 मे रोजी पडताळणी केली होती. तक्रारदार यांचे तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी प्रति ट्रक तीस हजारांची मागणी तहसीलदार गणेश जाधव यांनी केली होती. त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण 1 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते.

अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळीमध्ये तक्रारदार यांच्याकडे वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर यापुढे कारवाई न करण्यासाठी प्रति ट्रक 30 हजार या प्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार महिना या प्रमाणे तीन महिन्याचे 1 लाख 80 हजार रुपये तहसीलदार गणेश जाधव यांनी मध्यस्थामार्फत मागितले होते. तडजोडीनंतर दीड लाख रुपये रक्कम खासगी व्यक्ती रमेश मोगरगे याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे शनिवारी (दि.4) रमेश मोगरगे याने निलंगा येथे तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना पकडले. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (Deputy Superintendent of Police Pandit Rejitwad) करीत आहेत.

 

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan), पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli),
पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर (Police Inspector Anwar Mujawar) यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पथकाने केली.

 

Web Title :- ACB Trap On Ganesh Jadhav | Private agent along with nilanga tehsildar caught by ACB while accepting bribe of Rs 150,000 for illegal sand transport latur news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO सदस्यांनी ऑनलाइन कसे करावे नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी अप्लाय, काढू शकता 75 टक्के रक्कम

 

Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर चाकूने वार

 

Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? उलट सुलट बोलतात त्यावर मी का उत्तर देऊ; फडणवीस यांनी साधला निशाणा