Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर चाकूने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कार चोरी (Car Theft) करुन पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (old Pune-Mumbai Highway) चकमक उडाली. कार चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग केला. कार चोरांना थांबवून गाडीची चावी काढून घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी चाकूने वार (Knife) केला. तर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी पिस्तूल (Pistol) रोखले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात (Pune Pimpri Crime) यशस्वी झाले. हा थरार शुक्रवारी (दि.3) रात्री एक वाजण्याच्या सुमारास निगडी (Nigdi)-देहूरोड (Dehu Road) रस्त्यावर घडला.

 

चोरट्यांनी निगडी यमुनानगर (Yamunanagar) परिसरातून शुक्रवारी रात्री एक इकोस्पोर्ट कार (EcoSport Car) चोरली. याच दरम्यान रात्र गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड (Police Inspector Ajay Jogdand) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) नोंद करुन रात्र गस्तीसाठी निगडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी कार मालकाने पोलिसांची गाडी पाहिली आणि गाडी थांबवून कार चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कारचा क्रमांक, रंग आणि इतर माहिती घेऊन तात्काळ कारचा शोध सुरु केला.(Pune Pimpri Crime)

दरम्यान, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी नियंत्रण कक्षाला (Control Room) फोन करुन याबाबत माहिती देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले. त्यानंतर जोगदंड आणि त्यांच्यासोबत असणारे पोलीस कर्मचारी निशांत काळे (Nishant Kale) आणि प्रदीप गुट्टे (Pradip Gutte) हे भक्ती-शक्ती चौकातून (Bhakti-Shakti Chowk) जात होते. त्यावेळी त्यांना चोरीला गेलेली इको कार दिसली. पोलिसांनी त्यांच्या गाडीचा लाईट बंद करुन चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोर कार वेगाने पळवत असल्याने चोरटे पोलिसांच्या टप्प्यात येत नव्हते.

 

दरम्यान, निगडी-देहूरोडच्या सीमेवर समोर एक ट्रक आल्याने चोरट्यांनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी आडवी लावली. जोगदंड हे गाडीतून उतरून चोरट्यांच्या दिशेने धावले. त्यांनी कारच्या खिडकीतून गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण (Beating) केली. त्याचवेळी निशांत काळे आणि प्रदीप गुट्टे यांनी कारला घेरले. चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने जोगदंड यांच्यावर वार केला मात्र त्यांनी तो वार चुकवला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली.

पोलिसांना कारमध्ये आणखी दोन मोठे चाकू दिसले. कारमधील हत्यारे पाहून जोगदंड यांनी आपली पिस्तूल बाहेर काढून चोरट्यांवर रोखली. परंतु चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांना धक्का मारुन तेथून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधार असल्याने चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले.

 

आयुक्तांकडून शाबासकीची थाप

कारचोर आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीची माहिती मिळताच
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली. तसेच पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत
पोलीस निरीक्षक आणि दोन्ही पोलीस अंमलदारांचे कौतुक करुन शाबसकी दिली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | pune pimpri chinchwad car
thieves attacked police with knives 1 injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा