ACB Trap On Police Inspector | अटक करण्याची भिती दाखवून 25 लाखाच्या लाचेची मागणी; पहिला हप्ता म्हणून 2 लाख घेताना पोलीस निरीक्षकासह हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Inspector – अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटक करण्याची भिती दाखवून 25 लाख रुपयांची मागणी करुन पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपयांची लाच (Bribe Case) घेताना मुलुंड पोलीस ठाण्याच्या Mulund Police Station (गुन्हे) पोलीस निरीक्षकासह (PI) हवालदाराला (Police Havaldar) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) रंगेहाथ पकडले. (ACB Trap On Police Inspector)

 

पोलीस निरीक्षक भूषण मुकुंदलाल दायमा PI Bhushan Mukundalal Dayma (वय 40) आणि हवालदार रमेश मछिंद्र बतकळस Police Ramesh Machindra Batkalas (वय 46) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (ACB Trap On Police Inspector)

 

याबाबत एका 35 वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या तपासात मदत करण्याकरीता व गुन्ह्याचे स्वरुप कमी करण्यासाठी व अटक पूर्व जामीन रद्द झाल्याने अटकेची भिती दाखविली. अटक करु नये, यासाठी त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Maharashtra) 7 जुलै रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची 11 व 13 जुलैला पडताळणी केली. त्यात पोलीस निरीक्षक दायमा याने तडजोड करुन 11 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार याच्याकडून पहिला हफ्ता म्हणून 2 लाख रुपये स्वीकारताना दायमा व बतकळस यांना पकडण्यात आले. (Mumbai Bribe Case)

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विजय पाटील (Addl CP Vijay Patil), अपर पोलीस आयुक्त संजीव भोळे (Addl CP Sanjeev Bhole),
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कानडे (Addl SP Avinash Kande)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त साळुंखे पाटील (Assistant Commissioner of Police Salunkhe Patil),
पोलीस निरीक्षक विद्या जाधव (PI Vidya Jadhav) व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. (Mumbai ACB Trap Case)

 

Web Title :  ACB Trap On Police Inspector | Mumbai ACB Arrest PI Bhushan Dayma In Bribe Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा