Ravindra Mahajani Death | अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ravindra Mahajani Death | मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) यांचा मृत्यू झाला आहे. ते 77 वर्षाचे होते. पुण्यातील तळेगाव-दाभाडे (Pune Talegaon-Dabhade) येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. महाजनी यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

 

शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना (Police) दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी रविंद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू (Death) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) मुंबईत वास्तव्यास आहे. वडिलांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली. तो तत्काळ पुण्यात दाखल झाला आहे. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आला आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मिर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे.
आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) होतील, अशी माहिती समोर येत आहे.

 

Web Title :  Ravindra Mahajani Death | ravindra mahajani veteran
marathi actor died at the age of 77 found dead in flat talegaon dabhade pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा