ACB Trap On Two Police | जुगाराचा अड्डा सुरु ठेवण्यासाठी 40 हजाराची लाच घेताना दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन ACB Trap On Two Police | मटका (जुगार) (Gambling Den) व्यवसाय सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई (Legal Action) न करण्यासाठी अवैध व्यावसायिकाकडे 80 हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) वडनेर भैरव पोलीस ठाण्यातील (Wadner Bhairav Police Station) दोन पोलिसांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) रंगेहाथ पकडले. पोलीस नाईक संतोष दिनकर वाघ (Police Naik Santosh Dinkar Wagh) आणि पोलीस शिपाई किसन रमेश कापसे (Police Constable Kisan Ramesh Kapase) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे ही कारवाई 10 जुन रोजी केली. (ACB Trap On Two Police)

 

संतोष वाघ आणि किसन कापसे यांच्याविरुद्ध शनिवारी (दि.11) नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) दलातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचा मटक्याचा व्यवसाय असून हा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वाघ आणि कापसे यांनी दरमहा 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Nashik) तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता वाघ आणि कापसे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. (ACB Trap On Two Police)

 

तसेच लाचेची रक्कम शिरवाडे वणी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल सिटीझन (Hotel Citizen) येथे स्विकारण्याचे कबुल केले.
त्यानुसार नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) हॉटेल सिटीझन येथे सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाचेची 40 हजार रुपये रक्कम स्विकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
दोघांविरुद्ध शनिवारी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- ACB Trap On Two Police | ACB Trap On Two Police Man While Accepting Bribe of 40 thousands Nashik Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा