5000 रुपयांची लाच स्विकारताना मंत्रालयातील गृहविभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शस्त्र परवाना देण्यासाठी मंत्रालयातील गृहविभागात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत असल्याची चर्चा सुरु झाली असून मत्रालयात खळबळ उडाली आहे. अविनाश गलांडे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी स्वत:च्या नावाने शस्त्र परवाना मिळावा यासाठी 28 ऑगस्ट 2019 रोजी गृह विभागात अपील अर्ज सादर केला होता. अपील अर्जावर लवकरात लवकर कार्यकवाही व्हावी यासाठी गलांडे यावे 29 ऑगस्ट 2019 रोजी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचेची रक्कम न दिल्याने वारंवार मोबाईलवर फोन करून लाचेची रक्कम मागितली. तसेच बुधवारी (दि.2) तक्रारदार यांच्या व्हॅट्सअॅपवर मेसेज पाठवून 3 ऑक्टोंबरला भेटण्यासाठी बोलावून घेतले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने गलांडे याला 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com