Bhigwan : अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

भिगवण : पोलीसनामा आॅनलाईन

अपघातात दोन सख्ख्या लहान बहीणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भिगवण जवळ घडली आहे.चैताली दगडू सोनकांबळे (8)व ऋतिका दगडू सोनकांबळे (5 रा.आंबेडकर चौक ,भाऊपाटील रोड ,खडकी,पुणे) अशी मृत झालेल्या बहीणींची नावे आहेत. डाळज येथे लग्झरी बसने ट्रकला अोव्हरटेक करताना अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात जाऊन पलटी झाली यामध्ये दोन बहीणींचा मृत्यू झाला.

हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळील डाळ येथे गुरूवारी( दि.10) पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात किरकोळ जखमींना भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like