धुळे : क्रांतीस्मारक समोर दोन ट्रकचा भिषण अपघात ; चालक गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – दोंडाईचा धुळे रस्तावरील चिमठाणे गावाजवळ असलेल्या क्रांती स्मारका जवळच दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. यात सोनगीरकडून दोडाईचाकडे जाणाऱ्या ट्रकने दोंडाईचाकडुन येणाऱ्या आयशरगाडीवर चालकाचा ताबा सुटल्याने एकमेंकावर जाऊन आदळला यात आयशर ट्रक मधील चालक या जोरदार धडकेत कँबिन मध्येच दाबला गेला.

अपघात झाल्यानंतर काही वेळातच रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब पर्यत रांगा लागल्या. अपघाताबाबत शिंदखेडा पोलीसांना माहिती मिळाली.त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ गाठले. नागरीकांच्या मदतीने गाडीत दबलेल्या चालकाला बाहेर काढुन तातडीने पुढील उपचारार्थ धुळ्यातील चक्करबर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात चालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. पोलीसांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक पुर्ववत केली. शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरा पर्यत सुरु होते.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like