नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगणापूर फाट्याजवळ भीषण अपघात ३ ठार, ५ जण जखमी

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन – नगर-मनमाड रस्त्यावरील राहुरी तालुक्यातील शिंगणापूर फाट्याजवळ दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली. मयत हे पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सायंकाळच्या सुमारास बोलेर व ट्रक या दोन वाहनांचा शिंगणापूर फाट्यावर समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपमधील 3 जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी नगरमध्ये हलविण्यात आले आहे. मयत हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, बाभळेश्वर येथील पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Loading...
You might also like