सुरत-नागपूर महामार्गावर विचित्र अपघात, दोन ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – सुरत – नागपूर महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात साक्री- नामपुर रोडवर झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील खाली पडले. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बसचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

परशुराम दगा बागुल (वय- ४०), हिरामण चिंतामण गायकवाड (वय – ४० दोघे रा. प्रतापपुर) अशी मृतांची नावे आहे. बस चालक भास्कर दयाराम लोहार यांनी अपघाताची माहिती पोलीसांना दिली. परशुराम आणि हिरामण हे साक्री गावाहून नामपुर कडे कासव घेऊन मोटरसायकलवरुन जात होते.

त्यांना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे ते नामपुर रस्त्यावर खाली पडले. समोरुन येणाऱ्या बस चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही बसच्या चाकाखाली आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे महामार्गावरीव वाहतुक ठप्प झाली होती. साक्री पोलीसांनी घटनास्थळी पहाणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.