अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटाचा दिग्दर्शकाला जीएसटी घोटाळ्यात अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर आलेल्या अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर आधारित चित्रपट लवकरच येत असून या चित्रपटाचा दिग्दर्शक विजय गुट्टे याच्यावर जीएसटी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00HVJTQZI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40993432-96d6-11e8-a5be-578e4656a9b7′]

विजय गुट्टे याचे वडिल रत्नाकर गुट्टे यांनी २०१४ मध्ये गंगाखेड विधानसभा निवडणुक भाजपच्या तिकीटावर लढविली होती. त्यांचा मुलगा विजय गुट्टे यांनी अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाची घोषणा केली असून भाजप समर्थक अनुपम खेर हे त्यात मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. त्यांचे काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. विजय गुट्टे यांच्या व्हीआरजी डिचिटल कॉपोरेशन या कंपनीवर बनावट कागदपत्रे तयार करुन ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा जीएसटी विभागाचा कंपनीवर आरोप केला आहे. या कंपनीने २८ कोटी रुपयांचा परतावा जुलै २०१७ मध्ये मागण्यासाठी कागदपत्रे सादर केली तेव्हा कंपनी जीएसटीच्या स्कॅनरखाली आली. कंपनीने कोणताही मालाचा पुरवठा न करता बनावट बिले तयार करुन परतावा मागत असल्याचे लक्षात आले.

बँकांशी संगनमत करून शेकडो शेतकºयांच्या नावे कर्ज उचलणारे गंगाखेड शुगर अँड एनर्जीचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नुकताच नागपूर विधानपरिषदेत केला होता. गुट्टे यांनी ६०० शेतकऱ्यांच्या नावे ५५०० हजार कोटी रूपयांचे कर्ज उचलले. यात मृत शेतकऱ्यांच्या नावानेही त्यांनी कर्ज उचलल्याचा आरोप मुंडे यांनी केला. डीएस कुलकर्णींवर कारवाई होते मग रत्नाकर गुट्टे मोकळे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. आता वडिलांनंतर मुलगाही अडचणीत आला आहे.