भाजपला होते एका वर्षाला ‘इतक्या’ कोटीची कमाई 

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळाली आहे. सदस्य संख्येच्या बळावर हा बहुमान भाजपने मिळवला आहे. भाजपच्या सत्तेला आता उतरती कळा लागली आहे का असा सर्वत्र प्रश्न विचारला जात आहे. कारण तीन राज्यात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. तर भाजप हा खर्च आणि उत्पन्नाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचीच गणना केली जाऊ शकते असे असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म ( एडीआर ) या राजकीय अभ्यास करणाऱ्या संस्थेने म्हणले आहे.

एडीआर या संस्थेने म्हणल्या प्रमाणे २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात भाजपची कमाई हि १,०२७. ३३९ कोटी आहे. तर भाजपचा खर्च ७५० कोटीच्या घरात आहे. तर काँग्रेसने आपला ऑडिट रिपोर्ट सादर केला नसून भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा उत्पन्न आणि खर्च खूपच कमी आहे. काँग्रेसचे २०१६-१७ चे उत्पन्न २२५.३६ कोटी होते तर एडीआर या संस्थेच्या म्हणण्या नुसार भाजपच्या उत्पन्नात या वर्षी ७ कोटी रुपयांनी घट झाली असून २०१६-१७ चे भाजपचे उत्पन्न १,०३४. ३३९ कोटी एवढे होते. त्यात फक्त अल्पशी घट झाली असल्याचे या संशोधनातून निदर्शनाला आले आहे. काँग्रेसच्या उत्पन्नात तीन राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवल्या नंतर वाढ होणार असल्याचे म्हणले जात आहे. तर भाजपला मिळणारे उत्पन्न हे कल्पनेच्या बाहेरचे आहे.

एडीआर या संस्थेने जाहीर केलेल्या भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचे उत्पन्न हे पुढील प्रमाणे आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) –  उत्पन्न १०४.८४७ कोटी आणि  खर्च ८३.४८२

बहुजन समाजवादी पक्ष – उत्पन्न  ५१.६९४ कोटी आणि खर्च १४.७८ कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -उत्पन्न ८.१५ कोटी आणि खर्च ८.८४ कोटी

एडीआर या संस्थेने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या खर्च आणि उत्पन्नाच्या आकडेवारीत मजेशीर बाब अशी कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खर्च हे उत्पन्नापेक्षा अधिक आहे. तर राष्ट्रवादीचे उत्पन्न हे सर्वात कमी आहे.

संसदेवर दहशतवादी हल्लासदृश्य परिस्थिती ; एकच तारांबळ… अन् सुटकेचा निःश्वास