Corona Impact : यंदा ‘कोरोना’मुळं कर्मचार्‍यांच्या पगारात होणार फक्त ‘इतकी’ वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मागील काही महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता देश अनलॉकच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे देशाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात देखील करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षी पगार वाढ होणार नाही अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

एका आहवालात असे म्हटले आहे की, जरी भारतीय व्यावसायिकांच्या पगारामध्ये वाढ झाली तरी ती अत्यंत कमी असेल. याशिवाय काही कंपन्या पगारामध्ये अजिबात वाढ करणार नाहीत तर काही इतर कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करतील. मात्र, विशेष कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 टक्के किंवा त्याहून अधिक पगार वाढ होऊ शकते.

टीमलीजच्या नोकरी आणि पगारासंदर्भात प्रायमरि अहवालानुसार, कोरोनामुळे केवळ ना रोजगार प्रभावित झाला आहे पण त्यामुळे भारतीय उद्योगांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्याची पद्धत देखील बदलली आहे. या आहवालात असेही म्हटले आहे की, विभिन्न क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक उद्योजक सर्वाधिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त पगार वाढ देत आहेत. विविध क्षेत्रांत आणि शहरात पगार वाढ कमीतकमी 4.26 टक्के ते जास्तीत जास्त 11.22 टक्के आहे.

टीमलीजच्या सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यास घाबरत आहेत. मात्र, त्याच बरोबर त्या अधिक क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत देखील करत आहेत. वास्तविकपणे अशाप्रकारे अधिक कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी सध्या वाढत आहे.

विश्लेषणानुसार, यावर्षी पगारामध्ये वाढ दिसून येणारे प्रोफाइल्स म्हणजे बीएफएसआयमध्ये हडूप डेव्हलपर, शैक्षणिक सेवांमध्ये कार्यरत ॲनिमेटर्स, औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील कनेक्शन ऑफिसर आणि तंत्रज्ञान व ज्ञान सेवांमध्ये संबंध व डिजिटल मार्केटिंग प्रमुख इत्यादी आहेत. आहवालात असेही म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून सातत्याने महत्त्वपूर्ण काम करणारे कर्मचारी असणाऱ्या क्षेत्रांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकिंग, वित्त सेवा आणि विमा, ई-कॉमर्स आणि टेक स्टार्टअप्स, माहिती तंत्रज्ञान आणि ज्ञान सेवांचा समावेश आहे.