वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ रंग भिंतीवर लावा, घरातील वातावरण कायम आनंदी राहील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जेव्हा आपल्या घराच्या भिंती रंगवण्यात येतात तेव्हा आपल्या मनात फक्त एकच गोष्ट येते की आपले घर सुंदर दिसले पाहिजे. घर सुंदर दिसण्याबरोबरच सकारात्मक उर्जा देखील या रंगातून आपल्याला मिळत असते. अशा परिस्थितीत, आपण आपले घर रंगवताना रंगाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरासाठी कोणता रंग शुभ असेल ते जाणून घेऊ.

लाल रंगाचा वापर टाळा
वास्तुशास्त्रात लाल रंगाचा तीव्र आणि शक्तिशाली म्हणून वर्णन केले आहे. म्हणूनच हा रंग जेवणाची खोली, स्वयंपाकघर आणि मुलांच्या बेडरूममध्ये वापरु नये.

हा रंग द्या डायनिंग रूमला
आपल्या डायनिंग रूमचा रंग असा असावा की तो आपल्या घरात आनंद आणि शांती प्रतिबिंबित करेल. जे आपल्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण करेल. यासाठी आपण निळा, हिरवा आणि पिवळा रंग वापरू शकतो.

या रंगाने रंगवा बेडरूम
शक्यतो आपण आपला अधिक वेळ हा आपल्या बेडरूममध्ये घालवतो. यासाठी आपण आपल्या बेडरूममध्ये गुलाबी, निळा, हिरवा, राखाडी, जांभळा रंग वापरू शकतो. ज्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.

मुलांच्या रूममध्ये द्या हे रंग
मुलांना पाहून आपोआप आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटते. यासाठी मुलेही नेहमी आनंदी असणे गरजेचे असते. यासाठी मुलांच्या रूम मध्ये नारंगी, गुलाबी, निळा, हिरव्या रंगाचा वापर करावा.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like